Description
जन्म आणि मृत्यू यांच्यात लंबकासारखा फिरणारा वेळ म्हणजे आपल्याला मिळालेलं आयुष्य. या वेळेची सूत्रे ज्याला हाती ठेवता आली, त्याला आयुष्य सुखा-समाधानानं जगता आलं. अनेकांना ही उपरती होते वेळ निघून गेल्यानंतर. यासाठी वेळ व आयुष्य यांचं डोळसपणे व्यवस्थापन करता येणं आवश्यक आहे. यासाठी –
. घड्याळाचे कुसंस्कार कसे पुसावेत?
. स्पष्टतेचे सामर्थ्य म्हणजे काय?
. वेळेचे गणित तंत्रं व मंत्र कोणती?
. स्त्री व पुरुषाचे वेळ व्यवस्थापन वेगळे कसे? हे या पुस्तकात शिकाल.
कांचन दीक्षित या टाइम मॅनेजमेंट व सेल्फ मॅनेजमेंट प्रशिक्षक आहेत. घड्याळाशिवाय वेळ व्यवस्थापन व स्व-व्यवस्थापन करून जगणं सुंदर, सजग व अर्थपूर्ण कसं करावं याचं आजवर एक हजाराहून अधिक व्यक्तींना त्यांनी प्रशिक्षण दिलं आहे. वेळ नावाची अमूल्य गोष्ट तसं बघायला गेलं तर आपल्यासाठी अक्षरशः फुकट उपलब्ध असते. त्यामुळेच कदाचित आपण तिचं महत्त्व जाणत नाही. वेळ का महत्त्वाचा आहे आणि दैनंदिन जीवनात त्याचा विनियोग आपण जर सजगतेने केला तर भौतिक आणि मानसिक पातळीवर आपण अतिशय सकारात्मक परिणाम कसे मिळवू शकतो याचा वस्तुपाठ हे पुस्तक देतं. दीक्षितांनी वेळेचं व्यवस्थापन करताना आयुष्याचं व्यवस्थापन कसं करावं, याच्या अनुकरणीय गोष्टी सांगितल्या आहेत. युवा ते वृद्ध, नोकरदार ते व्यावसायिक, स्त्री-पुरुष अशा सर्वांसाठीच हे पुस्तक मार्गदर्शक ठरणार आहे.
राजेश मंडलिक सीईओ व एमडी सेटको स्पिंडल्स इंडिया प्रा.लि.
————————————————————————————————————————–
” कोणताही छोटा-मोठा उद्योग हा ’वित्तीय नियोजन, नियंत्रण व मोजमापा’शिवाय करताच येत नाही. यासाठी ’वित्त व्यवस्थापन’ नीटपणे माहीत असायला हवे.
वित्त व्यवस्थापन करण्यासाठी तुमच्याकडे वित्तीय व्यवस्थापक किंवा सल्लागार असतो; परंतु उद्योगाचे ’मालक’ म्हणून त्याचे नफा – तोटा पत्रक (Profit & Loss Account) आणि ताळेबंद पत्रक (Balance Sheet) तुम्हाला ढोबळमानाने बनवता, वाचता आले पाहिजे. तुमच्या उद्योगाची ’वित्तीय स्थिती’ तुम्हाला वेळोवेळी तपासता आली पाहिजे. महत्त्वाच्या उद्योजकीय निर्णयांचा वित्तीय परिणाम काय होईल हेसुद्धा तुम्हाला मोजता यायला हवे. तुम्ही जे उत्पादन/वस्तू किंवा जी सेवा ठााहकाला देऊ इच्छिता त्यासाठीचा खर्च नीटपणे मोजता आला तरच तुम्ही त्या उत्पादनाच्या विक्रीची योग्य अशी किंमत ठरवू शकाल. या विक्रीच्या किमतीने तुम्हाला अपेक्षित असा ‘ROI’ सुद्धा मिळावयास हवा. तुम्ही जेव्हा नव्या उद्योगात किंवा प्रकल्पात गुंतवणूक करता तेव्हा तुम्हाला अशा गुंतवणुकीचे शास्त्रोक्त पद्धतीने मूल्यमापन करता आले पाहिजे. वरील सर्व उद्देश लक्षात घेऊन मी या पुस्तकाचे अत्यंत सोप्या भाषेत लेखन केले आहे. तुम्हाला हे पुस्तक नक्की आवडेल व उपयोगी पडेल याची मला खात्री आहे. – डॉ. गिरीश जाखोटिया डॉ. गिरीश जाखोटिया हे मराठीतील नामांकित लेखक आहेत. डॉ. जाखोटिया हे आंतरराठ्रीय व्यवस्थापकीय, उद्योजकीय व वित्तीय सल्लागार आहेत. टाटा समूह, महिंद्रा समूह, गोदरेज, सिमेंस, एल अॅण्ड टी, ब्रिटिश पेट्रोलियम, ओमानची सेंट्रल बँक, बजाज ऑटो इ. साठहून अधिक नामांकित कंपन्यांसाठी त्यांनी सल्लागार म्हणून काम केले आहे.
Reviews
There are no reviews yet.