Talghar | तळघर

₹175

120 Pages

AUTHOR :- Narayan Dharap
ISBN :- 9789352203635

Share On :

Description

“ती जागी झाली होती. कशाने, तिला माहीत नव्हते. पण मनाला कोणत्या तरी खोलवरच्या पातळीवर धोक्याचा इशारा मिळाला असला पाहिजे. कारण तिच्या सर्व चित्तवृत्ती अत्यंत तीक्ष्णतेने आसपासच्या परिस्थितीचा वेध घेत होत्या. तीच ती चांदण्याने उजळलेली रात्र, तेच ते चंदेरी किरण… पण आता सर्वत्र एक निश्चलता होती-मोठी विलक्षण निश्चलता होती. वारा अजिबात पडला होता. झाडांचे एक पानही हलत नव्हते, ती सळसळत नव्हती- रातकिड्यांची किरकिर नव्हती-काहीही नव्हते. विलक्षण शांतता. हालचाल नाही. उघड्या खिडकीकडे पाहता पाहता तिला वाटले, हा खरा देखावा नाहीच, हे एक चित्र आहे-आपण खिडकीजवळ गेलो तर हाताला चित्रच लागेल.
सर्व शरीर गारठून बधिर झाल्यासारखे वाटत होते. तिने हात उचलला, तो गालावर, कपाळावर, मानेपाशी धरला-पण हात आणि गाल दोन्ही बर्फासारखे गार होते…. जणू उष्णता, ऊब या गोष्टी अस्तित्वातच नव्हत्या…. कधी कधी शरीराला ऊबच मिळाली नव्हती….आणि या गारठविणाऱ्या भीतीतून मनाला तो स्पर्श झाला…. उदासवाणी, घाणेरडी जागा सासूबाईंच्या जाऊबाई म्हणाल्या होत्या…. आणि आता तिच्या आसपास तो तीव्र, तिखट, दुष्टतेचा अर्क एखाद्या धुक्यासारखा पसरला होता…. तिला जाणवले की, खोलीत काहीतरी आले आहे…. काहीतरी दुष्ट, विकृत, पापी, सडके, कुजके, शापित, अस्पW…
त्या अतीव दुष्टतेच्या गाभ्यात एक अघोरी चेतना होती. त्या विकृतीच्या गर्भातून एक आवाज पुटपुटत आला… “मी आलो आहे.”

Additional information

About Author

Narayan Dharap
शिक्षण : रसायनशास्त्रात बी. एस्सी टेक (मुंबई विद्यापीठ)

कार्यक्षेत्र : मराठी साहित्यिक

साहित्य प्रकार : कादंबरी, रहस्यकथा, भयकथा, गुढकथा, विज्ञानकथा

मृत्यू : 18 ऑगस्ट 2008 पुणे

धारपांविषयी थोडेसे :

व्यवसायाच्या निमित्ताने काही वर्षे अमेरिकेत राहिलेले नारायण धारप हे नंतर पुण्यात स्थायिक झाले. पुण्यात त्यांनी फर्निचरचा व्यवसाय सुरू केला आणि त्याचबरोबर लेखनासही सुरुवात केली. गुढकथा, भयकथा, रहस्यकथा, विज्ञानकथा हे विविध साहित्य प्रकार त्यांनी अतिशय समर्थपणे हाताळले. मराठी साहित्यात रहस्यमय, भयग्रस्त गुढकथांचे आणि कादंबर्‍यांचे दालन समृद्ध करणारे जे काही मोजकेच स्वतंत्र लेखन करणारे लेखक आहेत. त्यात नारायण धारपांचे नाव अव्वल आहे. त्यांनी लिहिलेले ‘समर्थ’ हे काल्पनिक पात्र आणि त्यावर आधारित गुढकथांनी एक काळ गाजवला. त्यांच्या ‘अनोळखी दिशा’ या गुढकथांवर आधारित पुस्तकावरून एक मालिका इ.स. 2011 मध्ये स्टारप्रवाह या मराठी वाहिनीवर प्रदर्शित झाली. त्यांच्या कथांपासून प्रेरणा घेऊन आनंद राय यांनी 2018 मध्ये ‘तुंबाड’ या चित्रपटाची निर्मिती केली, ज्याचे लेखन आणि दिग्दर्शन राही बर्वे यांनी केले होते.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Talghar | तळघर”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat