Pratibhawaan Mule Ghadvinyasathi 650 Marg | Priy Aai-Baba Combo

₹270

320 Pages
AUTHOR :- Savita Jaju, Dr. Susheel Surve
ISBN :- 978-9352207756

Share On :

Description

मानसशास्त्रीय उपबोधन (Counselling) करताना अनेक पालकांच्या आपल्या पाल्याविषयींच्या तक्रारी ऐकायला मिळत.
या तक्रारींच्या मुळशी जे गैरसमज (Misunderstanding) असत ते दूर करण्यासाठी किशोरांच्या अपेक्षा आईबाबांपर्यंत पोहोचवण्याचं ठरवलं.

या कार्याची प्रेरणा रिआन् हॉलडे आणि त्याचे अमेरिकन मित्र (11 ते 12 वर्षे वयोगटातले) यांच्या प्रयत्नांतून मिळाली. मराठीतील त्याच वयोगटांतल्या मुलामुलींनी भरघोस प्रतिसाद दिला. त्यातून महाराष्ट्रीय किशोरांच्या अपेक्षांचा हा संग्रह तयार झाला.

तो ‘आईबाबा’ पर्यंत पोहोचावा हीच अपेक्षा.

– डॉ. सुशील सुर्वे
————————————————————————————————————————–

मुलं ही राष्ट्राची संपत्ती आहे. प्रतिभावान मुलांची जडणघडण करणे हे शिक्षक आणि पालकांचे राष्ट्रकार्य आहे. प्रत्येक मुलात एक बौद्धिक क्षमता असतेच. त्या क्षमतेला ओळखून, त्याला नीट प्रज्वलित करण्याचे काम पालक आणि शिक्षकांना करावयाचे असते.
मुलांचे व्यक्तिमत्त्व फुलविण्यासाठी, त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे. मुलांच्या समस्या कौशल्याने सोडवून त्यांना प्रोत्साहित करणे कौशल्याचे काम आहे. मुलांकडून चुका झाल्या की, त्या पुन्हा होऊ नये हे त्यांना समजावून सांगणे, त्यांचा आत्मविश्वास वाढविणे याची जागरूक पालक काळजी घेतात.

मुलांची बौद्धिक प्रगती जितकी महत्त्वाची आहे, त्याबरोबरच व्यावहारिक जगात वावरण्यासाठी त्याला प्रशिक्षण देणेही गरजेचे आहे, असे संस्कार प्रतिभावान
मुलं घडविताना शिक्षक आणि पालक करत असतात.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Pratibhawaan Mule Ghadvinyasathi 650 Marg | Priy Aai-Baba Combo”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat