Description
आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास उत्तम व्हावा याकरिता प्रत्येक पालक तळमळीने प्रयत्न करीत असतात.आता अनेक संशोधनांनी हे सिद्ध झाले की, बाळाच्या उज्ज्वल भविष्याचा पाया हा त्याच्या बालपणातच दडलेला असतो. तेजस्वी मूल हवे असल्यास गरोदरपणी कोणती काळजी घ्यावी, जन्मानंतर बाळाच्या बुद्धीचा विकास कसा करावा, स्मरणशक्ती कशी वाढवावी व बाळाला कसे शिकवावे! ही सर्व माहिती देणारे हे पुस्तक प्रत्येक पालकास नक्कीच उपयुक्त ठरेल.
———————————————————————————————————————-
बाळाला योग्य आणि अर्थपूर्ण नाव ठेवण्यासाठी प्रत्येक पालक धडपड करीत असतात. बाळाच्या आगमनाची चाहूल लागली की, बाळाच्या नावाचा विचार सुरू होतो. बाळाचं आगमन झालं की, ‘ह्याला काय म्हणायचं?’ असं सारेच विचारतात. बाळाच्या बारशाच्या वेळी तर प्रत्येकजण आपापल्या आवडीचे नाव सुचवित असतो. अशावेळी बाळाला योग्य आणि नेमकं नाव देण्यासाठी आपली मदत करणारी बाळाची ५५०० अर्थपूर्ण नावं. बाळाला योग्य नाव मिळाल्याचं प्रत्येक आईवडिलांना, आजी-आजोबांना समाधान देणारं पुस्तक.
Reviews
There are no reviews yet.