Aaplya Mulanchya Samasya Ani Upay | आपल्या मुलांच्या समस्या आणि उपाय

₹200

192Pages
AUTHOR :- Nasreen Patel
ISBN :- 9788177868722

Share On :

Description

“या पुस्तकामध्ये लेखिकेने आधुनिक युगातील पालकांसाठी सुयोग्य मार्गदर्शन केले आहे. मुलांमध्ये समस्या उद्भवल्यानंतर काय करायला हवे, याबद्दल सविस्तर ऊहापोह केला आहे. मूल होण्याआधी जर पालकांनी या पुस्तकाचे वाचन केले तर पालकत्व ही समस्या न ठरता पालकत्वातील सुखाची अनुभूती त्यांना येऊ शकेल, अशी माझी धारणा आहे.”
– डॉ. श्रीकांत चोरघडे, बालरोगतज्ज्ञ

“मुलांच्या समस्यांची मानसिक, सामाजिक तसेच मनोवैज्ञानिक अशी अनेक कारणे असतात, त्यांच्या समस्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यावर नसरीन पटेल यांनी पुस्तकरूपात पालक व वाचकांसाठी एक महत्त्वाची कलाकृती उपलब्ध करून दिली आहे. मुलांच्या समस्या व त्यावरील उपाय अत्यंत ओघवत्या शैलीत आणि प्रभावीपणे त्यांनी मांडले आहेत. मराठीत या विषयावर त्यामानाने लेखन कमी आहे, तेव्हा हे पुस्तक वाचकांच्या व पालकांच्या नक्कीच उपयोगाचे ठरेल.”
– डॉ. संजीव सावजी, न्यूरो-सायकॅट्रिस्ट

“आधुनिक जगातील वाढती स्पर्धा, गतिमान जीवन आणि संगणकाचा वाढता प्रभाव यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांचे यात मार्मिका चित्रण केले आहे. प्रकरणांमध्ये मांडलेले पालकांचे विविध प्रकार, शालेय मुलांचे शैक्षणिक, भावनिक वर्तन आणि इतर समस्यांमधून लेखिकेच्या सखोल व चिंतनशील अभ्यासाचा प्रत्यय येतो. एकूणच बदलत्या जगातील पालक-बालक व विद्यार्थी यांच्यातील संबंध मित्रत्वाचे होण्याच्या दृष्टीने हे पुस्तक निश्चितच मार्गदर्शक व उपयुक्त ठरला.”
– डॉ. मोहन आगाशे, मानसोपचारतजा आणि प्रसिद्ध अभिनेता

Additional information

About Author

लेखिका परिचय
• सौ. नसरीन वाहीद पटेल
एम.एस्सी. (ह्यूमन डेव्हलपमेंट), एम. ए. (मानसशास्त्र), एम.एड.
• १९९२ पासून शालेय व नंतर महाविद्यालयात मानसशास्त्र अध्यापनाचे कार्य करीत आहेत. त्याचबरोबर २००५ पासून ‘समुपदेशक' म्हणून देखील कार्यरत.
• ज्ञानप्रबोधिनी, पुणे आणि टाटा एज्युकेशन ट्रस्ट यांच्या 'बाल-युवा व्यक्तिमत्त्वविकास' (१०-२५ वर्षे वयोगट) या प्रकल्पासाठी समन्वयक व संशोधक म्हणून कार्य केले आहे.
• २००५ पासूनच सिंहगड इन्स्टिट्यूट, पुणे येथील महाविद्यालयांमध्ये मानसशास्त्र प्राध्यापिका, विद्याथीं समुपदेशक म्हणून कार्यरत. तसेच पुणे, नागपूर, अहमदनगर व गोवा येथे अनेक ठिकाणी गेस्ट लेक्चरर, परीक्षक म्हणून काम चालू आहे.
• विविध नियतकालिकांमधून तसेच परिषदांतून ‘शोधनिबंधांचे' सादरीकरण व प्रकाशन.
• विविध महाविद्यालय व विद्यापीठात आयोजित चर्चासत्रांमध्ये सहभाग.
• दै. सकाळ व गरवारे कॉलेज, पुणे यांनी राबविलेल्या 'अपयशातून यशाकडे' या दहावी-बारावीच्या विद्यार्थी आणि पालकांसाठीच्या प्रकल्पाअंतर्गत समुपदेशक व व्यवसाय मार्गदर्शक' म्हणून कार्य.
• लोकमत व महाराष्ट्र टाइम्स, पुणे या दैनिकांतून ‘मानसशास्त्र' व 'पालकत्व' या विषयांवरील लेख प्रसिद्ध.
• अध्यापक विद्यालयातील 'कृती-संशोधन व नवोपक्रम' या विषयासाठी महाराष्ट्र शासनातर्फे उत्तम अध्यापक म्हणून गौरव.
• पालकांसाठी मार्गदर्शक शिबिरे व कार्यशाळांचे आयोजन.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Aaplya Mulanchya Samasya Ani Upay | आपल्या मुलांच्या समस्या आणि उपाय”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat