Description
आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास उत्तम व्हावा याकरिता प्रत्येक पालक तळमळीने प्रयत्न करीत असतात. आता अनेक संशोधनांनी हे सिद्ध झाले की, बाळाच्या उज्ज्वल भविष्याचा पाया हा त्याच्या बालपणातच दडलेला असतो. तेजस्वी मूल हवे असल्यास गरोदरपणी कोणती काळजी घ्यावी, जन्मानंतर बाळाच्या बुद्धीचा विकास कसा करावा, स्मरणशक्ती कशी वाढवावी व बाळाला कसे शिकवावे! ही सर्व माहिती देणारे हे पुस्तक प्रत्येक पालकास नक्कीच उपयुक्त ठरेल.
————————————————————————————————————————–
मुलं ही राष्ट्राची संपत्ती आहे. प्रतिभावान मुलांची जडणघडण करणे हे शिक्षक आणि पालकांचे राष्ट्रकार्य आहे. प्रत्येक मुलात एक बौद्धिक क्षमता असतेच. त्या क्षमतेला ओळखून, त्याला नीट प्रज्वलित करण्याचे काम पालक आणि शिक्षकांना करावयाचे असते.
मुलांचे व्यक्तिमत्त्व फुलविण्यासाठी, त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे. मुलांच्या समस्या कौशल्याने सोडवून त्यांना प्रोत्साहित करणे कौशल्याचे काम आहे. मुलांकडून चुका झाल्या की, त्या पुन्हा होऊ नये हे त्यांना समजावून सांगणे, त्यांचा आत्मविश्वास वाढविणे याची जागरूक पालक काळजी घेतात.
मुलांची बौद्धिक प्रगती जितकी महत्त्वाची आहे, त्याबरोबरच व्यावहारिक जगात वावरण्यासाठी त्याला प्रशिक्षण देणेही गरजेचे आहे, असे संस्कार प्रतिभावान मुलं घडविताना शिक्षक आणि पालक करत असतात.
Reviews
There are no reviews yet.